मूळ सदाशिवगड कारवार येथील आणि सध्या वास्को येथे स्थायिक झालेल्या साध्वी सतीश सैल या युवतीची 61 व्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 साठी निवड झाली आहे. भारताच्या या नव्या सौंदर्यवतीला रत्नजडीत मुकूटही प्रदान करण्यात आला.
साध्वी ही कारवारचे कॉग्रेसचे आमदार सतीश सैल यांची कन्या आहे. तिचे बालपण व शिक्षण वास्को शहरात झाले आहे. तिने गोवा राज्याचे प्रतिनिधीत्व केले होते आणि अशा स्पर्धा निवडीसाठी गोव्यातून गेलेली ती एकमेव स्पर्धक आहे.
पूर्वप्राथमिक फेरीसाठी संपूर्ण देशातील 30 राज्यांतून 600 स्पर्धक उतरले होते. ही अंतिम फेरी भुवनेश्वर ओरिसा येथे झाली. झाली. साध्वी हिला एकूण 7 भाषा अवगत असून मनमिळावू आणि मितभाषी असलेल्या साध्वीचे कारवार तसेच गोवा प्रांतातून अभिनंदन करण्यात येत आहे. सदाशिवगड येथे आल्यावेळी आपला बहुतेक वेळ ती कारवार येथील आशा निकेतन या मुक आणि बधिर मुलांसाठी असलेल्या शाळेत घालवत असते.