गोव्याची अनुरा नंबर १

0
91

>> राष्ट्रीय वरिष्ठ महिला बॅडमिंटन क्रमवारी

गोव्याची स्टार व युवा शटलर अनुरा प्रभुदेसाईने गरूड झेप घेताना अखिल भारतीय स्तरावरील राष्ट्रीय वरिष्ठ बॅडमिंटन क्रमवारीत महिला एकेरीत आणि दुहेरीत अग्रस्थान मिळविले आहे. भारतीय बॅडमिंटन संघटनेने ही क्रमवारी जाहीर केली आहे. राष्ट्रीय वरिष्ठ क्रमवारीत अग्रस्थान मिळविणारी ती गोव्याची पहिली बॅडमिंटनपटू ठरली आहे.

गेल्या महिन्यात महिला एकेरीत अनुरा तिसर्‍या तर दुहेरीत चौथ्या स्थानी होती. राष्ट्रीय स्पर्धांत अखिल भारत विमानतळ प्राधिकरणाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आणि महिला एकेरीत अग्रस्थानावर पोहोचलेल्या अनुराचे २८८२ रेटिंग गुण झाले आहेत. तिच्यानंतर मध्य प्रदेशची श्रीयांशी परदेशी (२,४७२) आणि आंध्रप्रदेशची सीएच. साई उत्तेजिता राव (२,४१३) द्वितीय व तृतीय स्थानी आहे. तर महिलांच्या दुहेरीत अनुरा १,८०४ रेटिंग गुणांसह अग्रस्थानी आहे. केरळची अंतो ऍग्नो १,६१५ रेटिंग गुणांसह द्वितीय तर केरळचीच स्नेहा सांतिलाल १,६१५ रेटिंग गुणांसह तृतीय स्थानी आहे.