गोवा वेटरन क्रिकेटर्स श्रीलंका दौर्‍यावर

0
91

गोवा वेटरन क्रिकेटर्स संघ १० ते २१ मेपर्यंत १२ दिवसांच्या श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहे. ‘डीबी६६स्पोर्ट्‌झ’च्या व्यवस्थापनाखाली या क्रीडा दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौर्‍यात संघ वेटरन क्रिकेट क्लब ऑफ कोलंबो, गाले, कँडी आणि नुवारा एलिया या संघांबरोबर एकूण ५ सामने खेळणार आहे. या दौर्‍या गोवा वेटरन संघ अशोक वाटिका, तूथ टेंपल, रावण धबधबा, टी इस्टेट्‌स, एलिफंट ओर्फानेज, गोले फोर्ट आणि कोलंबो, गाले, व कँडी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्थळांना भेट देणार आहे.
या संघात सुदेश प्रभुदेसाई (माशे क्रिकेट क्लब), पॉल फर्नांडिस आणि अमर देविदास (आर्लेम क्रिकेट क्लब), अनिल माशेलकर आणि शैलेश वेर्णेकर (विजय क्रिकेट क्लब), तेजस बोरकर (मारुती स्पोर्ट्‌स क्लब), सुदेश राणे (कुडचडे), संतोष लोटलीकर, ऍड. उदय नाईक, समीर गावस देसाई, संदीप दलाल, श्रीराम शिमोगा (एमसीसी), राजेश चौगुले आणि डॉ. देवाशिष बागची (मडगाव), सी. अशोक (वास्को) आणि जयंत शेट्टी (मंगळुरू) यांचा गोवा वेटरन संघात समावेश आहे. विनोद धामस्कर संघ संघटक म्हणून दौर्‍यावर जातील.