उपसभापतींच्या हस्ते क्रीडा साहित्याचे वितरण

0
69

नागेशी स्पोर्ट्‌स क्लब (एनएससी) या क्रीडा गटाला उपसभापतींच्या हस्ते क्रीडा सामुग्री प्रधान करण्यातआली युवकांना प्रोत्साहन यावं या हेतूने हे वितरण करण्यात आले आहे. ब्याट, बॉल, स्टम्स, हॉली बॉल, फुटबॉल, नेट अशा विविध क्रीडा सामुग्रीचा त्यात समावेश आहे.
युवकांनी क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घ्यावी, फक्त गाव पातळीवर समाधान न मानता, राज्य पातळीवर व देशपातळीवर आपल्या शौर्याची चमक त्यांनी दाखवावी असे आव्हान उपसभापती विष्णू वाघ यांनी केले. त्याचबरोबर येत्या काही दिवसात भव्य अशा क्रिकेट टोर्नामेंटचे आयोजन करण्यात येईल तेव्हा यात सर्व खेळाडूंनी भाग घ्यावा असेही श्री वाघ म्हणाले. यावेळी मनोज मार्शेलकर, सुरज कुंकळकर, महानंद कुंडईकर, सुरज नाईक, दिनेश वेर्णेकर व इतर युवक उपस्थित होते.