गोवा विधानसभा अधिवेशन फेब्रुवारीत होण्याची शक्यता

0
104

गोवा विधानसभेचे पाच दिवसीय अधिवेशन फेब्रुवारी २०२० महिन्याच्या सुरुवातीला घेतले जाण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या आगामी अधिवेशनाच्या तारखांवर चर्चा करण्यात आली असून ४ फेब्रुवारीपासून अधिवेशनाला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी गोवा विधानसभेचे अधिवेशन १५ जुलै ते ९ ऑगस्ट २०१९ दरम्यान घेण्यात आलेले आहे.

राज्य विधानसभेचे वर्ष २०१९ मध्ये केवळ २३ दिवस कामकाज घेण्यत आलेले आहे. वर्ष २०१८ मध्ये १६ दिवस कामकाज घेण्यात आले आहे. तर वर्ष २०१७ मध्ये २३ दिवस कामकाज घेण्यात आलेले आहे.

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी राज्य विधानसभेचे कामकाज वर्षभरात कमीत कमी ६० दिवस झाले पाहिजे, असे मत गोवा विधानसभेच्या भेटीच्या वेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जास्त दिवसांचे अधिवेशन घेण्याचे जाहीर केले होते. परंतु, अधिवेशन जास्त दिवस घेणे शक्य झालेले नाही.