गोवा फॉरवर्डचे उमेदवार योग्य वेळी जाहीर करू : खंवटे

0
98

>> म्हापशात ३०० युवक पक्षात दाखल

 

गोवा फॉरवर्डच्या मिशन बार्देशला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला असून म्हापसा येथील सुमारे तीनशे युवकांनी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीसाठी पक्षाने सध्या संघटना बांधण्यावर भर दिला असून निवडणुकीसाठी योग्यवेळी पक्षाचे उमेदवार जाहीर करणार असल्याचे आमदार रोहन खंवट यानी काल सांगितले.
भाजप सरकारने प्रचंड घोटाळे आहेत. ज्या पद्धतीने बीच क्लिनींग कंत्राट घोटाळा पक्षाने लावून धरला. त्याच पद्धतीने महामार्ग स्वच्छ करण्याच्या कंत्राटामागील घोटाळ उघड करून लोकआयुक्ताकडे तक्रार देणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले. वरील घोटाळ्यात सत्ताधारी पक्षाचा एक आमदार गुंतला असून कागदपत्रे गोळा करण्याचे काम चालू आहे, असे त्यांनी सांगितले. या सरकारातील सर्व घोटाळ्यांची चौकशी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, गोवा फॉरवर्डचा म्हापसा मतदारसंघावर डोळा असून त्या दृष्टीकोनातून काम सुरू झाले आहे.