Home Featured गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्याअध्यक्षपदी गिरीश चोडणकर

गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्याअध्यक्षपदी गिरीश चोडणकर

0

अखिल भारतीय काँग्रेस समितीने गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांची काल नियुक्ती केली. या संदर्भातील आदेश राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जारी केला. गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पदावरून अमित पाटकर यांना तडकाफडकी हटवण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर 2022 मध्ये गोवा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अमित पाटकर यांची करण्यात आली होती. अमित पाटकर यांना पदावरून हटविण्यासाठी गेले कित्येक महिने अंतर्गत हालचाली सुरू होत्या. त्यानंतर काल केंद्रीय पातळीवरून अमित पाटकर यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.

कार्यकारी अध्यक्ष म्हणून एम. के. शेख, आमदार आल्टन डिकॉस्टा, आमदार कार्लुस फरेरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खजिनदार म्हणून दत्ता डी. नाईक, प्रचार प्रमुख म्हणून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, जाहीरनामा समितीच्या प्रमुखपदी खासदार विरियातो फर्नांडिस, समन्वयक समितीचे अध्यक्ष म्हणून फ्रान्सिस सार्दिन, सहअध्यक्ष म्हणून सुनील कवठणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.