गोवा आयआयटीचे पालकत्व मुंबई आयआयटीने स्वीकारले

0
103

चालू शैक्षणिक वर्षात सुरू होणार्‍या गोवा आयआयटी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षांपर्यंत मुंबई आयआयटीचा आश्रय असेल. मुंबई आयआयटीने गोवा आयआयटीच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे.

आयआयटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणवत्ता यादी तयार करताना अन्य केंद्रांबरोबर आता गोवा हा पर्याय विद्यार्थ्यांना दिला आहे. त्यामुळे चालू वर्षात गोव्यात आयआयटी अभ्यासक्रम सुरू करण्याचा मार्ग मोेकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये हा अभ्यासक्रम सुरू होईल. कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल्स व मेकॅनिकल अशा तीन शाखांसाठी प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. १५ जुलैनंतर प्रत्यक्ष आयआयटी अभ्यासक्रम सुरू होईल.