गोमेकॉत प्राणवायू टाकी बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ः मुख्यमंत्री

0
148

बांबोळी येथील गोमेकॉतील वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन २० हजार लीटर क्षमतेची प्राणवायू टाकी बसविण्याचे काम जोरात सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल दिली.

गोमेकॉमध्ये प्राणवायूच्या अभावामुळे मध्यरात्रीच्या वेळी रुग्णांचे बळी जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्राणवायूचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन २० हजार लीटर क्षमतेची प्राणवायू टाकी बसविण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला असून प्राणवायू टाकी बसविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. यापुढे इस्पितळाला ट्रॉलीवर जास्त अवलंबून राहावे लागणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी प्राधान्यक्रम दिला जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.