गोमेकॉतील कामचुकार नर्सेसना हाकलून लावा : विश्‍वजित

0
64

बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार घेत असताना रुग्णांची दुर्दशा झाल्याचा आरोप करून अनेक परिचारिका रुग्णांना हात लावण्यास तयार नसतात. त्यांना सेवेतून हाकलून लावा, अशी मागणी माजी आरोग्यमंत्री तथा आमदार विश्‍वजित राणे यांनी काल विधानसभेत केली. इस्पितळात दलाली सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. रक्ताच्या चाचण्या करण्यास रुग्णांना मणिपाल इस्पितळात पाठविले जाते. त्यासाठी काही दलाल इस्पितळात ठाण मांडून असतात, असे राणे यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले.