Home बातम्या गोमंतक भंडारी समाज संस्थेची त्वरित निवडणूक घेण्याची मागणी

गोमंतक भंडारी समाज संस्थेची त्वरित निवडणूक घेण्याची मागणी

0

गोमंतक भंडारी समाज संस्थेची निवडणूक त्वरित घेण्याच्या मागणीसाठी गोमंतक भंडारी समाजातील एका गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आझाद मैदानावर काल धरणे आंदोलन केले.
राज्य सरकारने गोमंतक भंडारी समाज संस्थेवर त्वरित प्रशासकाची नियुक्ती करून निवडणूक घ्यावी. येत्या आठ दिवसांत 2 फेब्रुवारीपर्यंत निर्णय न घेतल्यास संस्था निबंधक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा गोमंतक भंडारी समाजातील ज्येष्ठ नेते संजीव नाईक यांनी काल दिला.
गोमंतक भंडारी समाज संस्थेवर समाजातील दोन गटांनी दावा केला असून हा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पोहोचला आहे. न्यायालयाने सरकारला 8 आठवड्यांत निर्णय घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, सरकारने न्यायालयाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष केले आहे. राज्य सरकारने भंडारी समाज संस्थेवर तातडीने प्रशासकांची नियुक्ती करून निवडणूक प्रक्रिया सुरू करावी; अन्यथा भंडारी समाज बांधवांना आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा संजीव नाईक यांनी दिला.