Home बातम्या उत्तर प्रदेश राज्याच्या विभाजनाची भाजप नेत्यांची मागणी

उत्तर प्रदेश राज्याच्या विभाजनाची भाजप नेत्यांची मागणी

0

उत्तर प्रदेश राज्याच्या विभाजनाची पुन्हा एकदा मागणी जोर धरू लागली आहे. मागील काही महिन्यांपासून भाजपच्याच नेत्यांनी राज्याच्या विभाजनाचे समर्थन केले आहे. आता अमेठीतूनही ही मागणी पुढे आली आहे. पूर्वांचल राज्याची स्थापना करण्याची मागणी एका कार्यक्रमात करण्यात आली.
या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री डॉ. संजय सिंह आणि माजी शिक्षण मंत्री डॉ. अमिता सिंह यांनी स्पष्ट शब्दात पूर्वांचलचा विकास तेव्हाच शक्य आहे जेव्हा या प्रदेशाला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळेल, असे विधान केले. उत्तर प्रदेश देशातील सर्वात लोकसंख्या असलेले राज्य आहे. जिथे एका प्रशासकीय रचनेतून सुशासन आणणे कठीण आहे. जगातील पाचव्या क्रमांकाच्या देशापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यात विकास आणि लोकशाही दोन्ही प्रभावित होतात. पूर्वांचलमधील लोकांचा विकास, रोजगार आणि चांगले प्रशासन यासाठी वेगळे राज्य स्थापन झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. प्रस्तावित पूर्वांचल राज्यात उत्तर प्रदेशातील 8 विभागीय मंडळातील 28 जिल्हे समाविष्ट केले करावे लागतील. जवळपास 7 कोटी 98 लाख लोकसंख्या असलेले हे राज्य देशातील 14 वे सर्वात मोठे राज्य ठरेल. पुढील 2027 च्या निवडणुकीपूर्वी हे अस्तित्वात आणता येईल, असेही त्यांनी नमूद केले.