गेल्या ४ दिवसांत १५ कोविड बळी

0
37

गेल्या २४ तासांत राज्यात आणखी ४ कोविड रुग्णांच्या बळीची नोंद झाली आहे. तसेच नवे ५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६०० झाली आहे. दुसरीकडे, राज्यात गेल्या ४ दिवसांत १५ कोरोनाबाधित रुग्णांचा बळी गेला आहे. तसेच राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३३५० एवढी झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७८ टक्के एवढे आहे. तसेच ६ रुग्णांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला. नव्या सापडलेल्या रुग्णांपैकी ४२ जणांनी गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे, तर ११ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.