गेल्या चोवीस तासांत देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

0
38

देशात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारांपेक्षा कमी होती. मात्र, गेल्या २४ तासांत पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ही वाढ आधीच्या रुग्णसंख्येत तब्बल २३ टक्के आहे. बुधवारी देशात ४६ हजार १६४ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून ६०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३४ हजार १५९ जण बरे झाले आहेत. देशातील रिकव्हरी रेट ९७.६३ टक्क्यांवर आहे. आठवड्यातील पॉझिटीव्हीटी रेट २.२ टक्क्यांवर असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी रेट २.९८ टक्क्यांवर आहे. हा रेट गेल्या ३१ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा खाली आहे.