गृह विलगीकरणातील रुग्णांसाठी ‘कॉल सेंटर’

0
121

राज्य सरकारने उत्तर गोव्यातील पाच तालुक्यांतील गृह विलगीकरणातील कोरोनाबाधितांच्या माहितीचे संकलन आणि त्यांना मदत करण्यासाठी कॉल सेंटरची स्थापना केली आहे.
उत्तर गोव्यातील तिसवाडी, बार्देश, सत्तरी, डिचोली आणि पेडणे या तालुक्यांसाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कॉल सेंटरमध्ये १०८ स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या सेंटरमधील कर्मचार्‍यांनी गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्या आरोग्य स्थितीची माहिती घेतली पाहिजे. या माहितीचे संकलन करून ती आरोग्य विभागाच्या पोर्टलवर अपलोड केली पाहिजे. दरम्यान, या कॉल सेंटरमधील कर्मचार्‍यांनी रुग्णांना दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती संकलनाचे काम सुरू केले आहे.