आसामच्या मुख्यमंत्रीपदी हिमंत विस्वसर्मा शपथबद्ध

0
132

आसाममध्ये भाजपचे नेते हिमंत विस्वसर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत १३ आमदारांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
या शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग, नागालँडचे मुख्यमंत्री नीपीयू रिओ उपस्थित होते. तसेच माजी मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल हे देखील उपस्थित होते.
हिमंत विस्वसर्मा यांच्या मंत्रिमंडळात रंजीत कुमार दास, अरमुखतुल बोरा, यूजी ब्रह्मा, परिमल शुक्ल बैद्य, चंद्र मोहन या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.