१८ वर्षांवरील नागरिकांना लवकरच प्रतिबंधक औषधे

0
112

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती

राज्य सरकार कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून १८ वर्षांवरील नागरिकांना रोगप्रतिबंधक औषधांचे वितरण सुरू करणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.

राज्यात या उपचार पद्धतीची तातडीने अंमलबजावणीकरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या उपचाराअर्तंगत १८ वर्षांवरील नागरिकांना ‘इव्हर्मेक्टिन’ गोळीचे वितरण केले जाणार आहे. सलग पाच दिवस ही गोळी घेतली पाहिजे. या गोळीच्या सेवनामुळे कोरोना मृत्यूदरात घट झाल्याचे युके, इटली, स्पेन आणि जपान येथील वैद्यकीय तज्ज्ञांना आढळून आले आहे, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.
या गोळ्या राज्यातील जिल्हा, उपजिल्हा, प्राथमिक आरोग्य केंद्र, सामाजिक आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्र आणि गोमेकॉत उपलब्ध केल्या जाणार आहेत. ही गोळी घेतल्यानंतर कोरोनाची बाधा होऊ शकते; परंतु रुग्णाला जास्त त्रास होत नाही. कोरोनाची लक्षणे नसलेले नागरिक सुध्दा ही गोळी घेऊ शकतात, असेही राणे यांनी स्पष्ट केले.