गृह आधार लाभार्थींना ऑक्टोबरपासून दीड हजार

0
66

>> मुख्यमंत्र्यांची घोषणा

 

आपले सरकार प्रत्येक आघाडीवर यशस्वी ठरले असून गृहआधार योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबरपासून दरमहा १२०० रुपयांऐवजी दीड हजार रुपये मिळतील, अशी घोषणा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या पक्षाच्या महिला मेळाव्यात केली.
वरील याजनेखालील रक्कम वाढविण्याचा सरकारने यापूर्वी निर्णय घेतला होता. आता त्याची अंमलबजावणी होत असल्याने पार्सेकर यांनी समाधान व्यक्त केले.
भाभासुमंने माध्यम व इंग्रजी शाळांना अनुदान प्रश्‍नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. अनुदान रद्द करण्याची मागणी अयोग्य आहे. त्यामुळे महिलांनी एकत्र येऊन भाभासुमंच्या नेत्यांच्या मुद्यांचे खंडन करून जनतेमध्ये पक्षाच्या धोरणात बाबतीत जागृती करावी, असे आवाहन पार्सेकर यांनी केले. भाभासुमंच्या नेत्यांचे आरोप सरकारने सहन केल्याचे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आम आदमीला चांगले फैलावर घेतले.