गृह आधार योजनेमध्ये दुरूस्ती

0
130

>> हयात दाखला व उत्पन्न दाखल्याची सक्ती

सरकारने गृह आधार योजनेमध्ये दुरुस्ती केली असून या योजनेच्या लाभार्थींना प्रत्येक वर्षी हयात दाखला आणि मामलेदारांकडून घेतलेला उत्पन्न दाखला देण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच, लाभार्थींच्या खात्यात जमा झालेली रक्कम सलग सहा महिने न काढल्यास खात्यात जमा रक्कम संबंधित बँकेने डिमांड ड्राफच्या माध्यमातून महिला व बाल कल्याण खात्याकडे परत जमा करण्याची सूचना करण्यात आली आहे.

लाभार्थींनी हयात व उत्पन्न दाखला दरवर्षी गृह आधार योजना ज्या महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. त्याच महिन्यात सादर करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. हे दोन्ही दाखले तालुका पातळीवरील महिला व बालकल्याण खात्याच्या कार्यालयात सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. लाभार्थीचा बँक अकाऊंट आधारला जोडलेला असला पाहिजे.

गृह आधार योजनेची अर्जदार मूळची गोव्याबाहेरील असल्यास आणि तीने गोमंतकीय व्यक्तीशी विवाह केलेला असल्यास तिने आपल्या जन्मदाखल्याची प्रमाणित प्रत आणि गोव्यातील एक वर्षाचा वास्तव्याचा दाखला नवर्‍याच्या १५ वर्षाच्या रहिवासी दाखल्यासोबत जोडण्याची सूचना करण्यात आली आहे.