गृहमंत्री शहांच्या इशार्‍याने पाकिस्तानचा शांततेचा राग

0
31

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काल गोव्यात पाकिस्ताननला दिलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या इशार्‍यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणल्याचे दिसून येत असून शहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानने आम्ही शांतताप्रिय असल्याचे सांगितले आहे.

जर जम्मू काश्मीरमधील अतिरेकी कारवायांना पाकिस्तानाचे मिळणारे समर्थन आणि सहकार्य थांबले नाही तर पुन्हा पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू असा इशारा काल धारबांदोडा येथे गृहमंत्री अमित शहा यांनी दिला होता. त्यावर पाकिस्तानने आम्ही शांतताप्रिय आहोत. मात्र भारताकडून कुठलीही आक्रमक पावले उचलल्यास त्याला प्रत्युत्तर देऊ असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे.

दरम्यान, गोव्यात बोलताना पाकिस्तानला अमित शहा यांनी हा इशारा देताना पाकिस्तानला २०१६ ची आठवण करून दिली आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिवंगत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक कऱण्यात आला होता. पुन्हा जर पाकिस्तानने तशी आगळीक केली तर भारत पुन्हा कारवाई करू शकतो असे शहा यांनी म्हटले होते.