शुक्रवारी राज्यात कोरोनाचे ४ बळी

0
25

>> चोवीस तासांत ५४ बाधित

राज्यात गेल्या चोवीस तासांत ४ रुग्णांच्या बळींची नोंद झाली आहे. तसेच गेल चोवीस तासांत नवे ५४ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील सध्याच्या सक्रिय रुग्णांची संख्या ६७९ झाली आहे.

राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३३३९ एवढी झाली आहे. बळी गेलेल्यामध्ये म्हापसा येथील एका ३० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.

राज्यात काल शुक्रवारी ८१ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७५ टक्के एवढे आहे. ४७ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. ६ जणांना घरी पाठविण्यात आले. ७ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.