गुळेलीत आयआयटी केंद्र उभारणार

0
114

राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत राज्याच्या शॅक धोरणाला मंजुरी देण्यात आली. जे शॅकचालक गेल्या कित्येक वर्षांपासून किनार्‍यावर शॅक्स घालत आहेत त्यांना शॅक्स घालण्यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गुळेली येथे आयआयटी केंद्र उभारण्यास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
काणकोण, सांगे येथे हे इन्स्टिट्यूट उभारण्यास विरोध झाल्यानंतर ते सत्तरी येथे हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ज्येष्ठतेनुसार १० वर्षांसाठी, ५ वर्षांसाठी व एका वर्षासाठी याप्रमाणे शॅक्स परवाने देण्यात येणार आहेत. तसेच १० वर्षांपासून जे या व्यवसायात आहेत त्यांना ५० टक्के एवढे शॅक्स, १० वर्षांपेक्षा कमी काळापासून व्यवसायात आहेत पण ज्यांनी ५ वर्षांचा काळ पूर्ण केलेला आहे त्यांना ४० टक्के शॅक्स तर उर्वरित १० टक्के जागा या ५ वर्षांपेक्षा कमी काळापासून या व्यवसायात आहेत त्यांना देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. घुमट वाद्याला राज्याच्या वारसा संगीत वाद्याचा दर्जा देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

आयआयटीला १० लाख चौ. मी. एवढी जमीन देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.