गुलाम नबी आझादांचा पुतळा जम्मूत जाळला

0
223

माजी राज्यसभा खासदार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा पुतळा जम्मूमध्ये काही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळला. तसेच यावेळी त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. आझाद यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. मंगळवारी कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते जम्मूत रस्त्यावर उतरले. त्यांनी यावेळी आझाद हे पक्षाविरुद्ध कारवाया करत असल्याचा आरोप करत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली.

काही दिवसांपूर्वी गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली जी – २३ नेते जम्मूत एका कार्यक्रमात एकत्र जमले होते. या कार्यक्रमात गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. तसेच कॉंग्रेस नेतृत्व आणि पक्षाच्या भवितव्याबद्दल अनेक प्रश्नही उपस्थित केले होते. यावर कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेपही घेतला होता.