गुन्हे मागे घेतल्यानंतरच चर्चा

0
199

>> शेतकरी मागण्यांवर ठाम

केंद्राने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या दोन महिन्यांहून अधिक दिवसआंदोलन करत आहेत. काल शेतकरी नेत्यांनी जोपर्यंत निर्दोष शेतकर्‍यांवर आणि शेतकरी नेत्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जात नाहीत. तसेच या भागातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरळीत होत नाही तोपर्यंत चर्चेची शक्यता नाही असे म्हटले आहे.

दिल्ली सरकारकडून आम्हाला ११५ लोकांची एक यादी मिळाली आहे. परंतु, अद्यापही आमचे सहा लोक बेपत्ता आहेत, आम्ही लोकांसोबत हेल्पलाईन क्रमांक शेअर केलेला आहे. अशा परिस्थितीत सरकारसोबत चर्चा होणार नाही, असे शेतकर्‍यांनी सांगितले.

आणखी एक अटकेत
शेतकर्‍यांच्या दिल्लीतील २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर मोर्चात झालेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीस अटक केली आहे. धर्मेंद्रसिंग हरमन असे त्याचे नाव असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर त्याला अटक झाली आहे.