आमदार अपात्रता याचिकेवर २६ रोजी होणार सुनावणी

0
213

गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर येत्या २६ फेब्रुवारी २०२१ रोजी १२ आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिकेवर सुनावणी घेणार आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आमदार अपात्रता प्रश्‍नी दाखल याचिकेवर येत्या ९ फेब्रुवारी २०२१ ला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
कॉँग्रेसचे गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका जुलै २०१९ मध्ये दाखल केली होती. तसेच मगो पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोन आमदारांच्या विरोधात मगोपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी अपात्रता याचिका दाखल केलेली आहे.