गुजरात विधानसभेच्या सर्व जागा आप लढवणार

0
101

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगल्या कामगिरीनंतर आता आम आदमी पार्टीने गुजरातमधील विधानसभा निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे. आम आदमी पार्टी (आप) २०२२ मध्ये होणार्‍या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागा लढवणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. विधानसभा निवडणुकी अगोदर गुजरातमध्ये आपचा प्रसार करण्यासाठी केजरीवाल काल अहमदाबादेत पोहचले. यावेळी त्यांच्या उपस्थितीत काही जणांनी आपमध्ये प्रवेश देखील केला.