गास्पर डायस टेनिस २६ पासून

0
96

गास्पर डायस टेनिस स्पर्धा २६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत खेळविली जाणार असून स्पर्धेसाठी एकूण ८८ हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. महिला व पुरुष एकेरीतील विद्यमान विजेते तेजस शेवडे व सिमरन खान यांनी यंदादेखील आपला प्रवेश निश्‍चित केलाआहे.

१२ वर्षांखालील (मुली व मुलगे), १६ वर्षांखालील (मुली व मुलगे), पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, मिश्र दुहेरी, पुरुष व्हेटरन्स एकेरी (४५ वर्षांवरील), पुरुष व्हेटरन्स एकेरी (५५ वर्षांवरील), पुरुष व्हेटरन एकेरी (६० वर्षांवरील) हे प्रमुख गट आहेत. या गटांव्यतिरिक्त पुरुष व्हेटरन्स दुहेरी ९० + (दोन्ही खेळाडूंचे वय मिळून ९० पेक्षा जास्त असावे), ११० + व १२० + गटात ज्येष्ठ खेळाडू आपली प्रतिभा दाखवू शकतात. व्हेटरन विभागासाठी प्रवेश बंद झाला असून इतर गटांसाठी २४ जानेवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश दिला जाणारआहे.