आयपीएल ७ एप्रिलपासून

0
81

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) यंदाचा मोसम ७ एप्रिलपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील सामन्याने सुरुवात होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काल सोमवारी जाहीर केले. याच मैदानावर २७ मे रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ शुभारंभी सामना खेळणार असून वेळापत्रक जाहीर होताच त्यांचा प्रतिस्पर्धी समजणार आहे. यंदाच्या मोसमापासून दिवसातील पहिला सामना ५.३० वाजता व रात्रीचा सामना ७ वाजता सुरू होणार आहे. सामना प्रक्षेपणासाठी एकापेक्षा जास्त वाहिन्या असल्याने स्टार समुहाने वेळेमद्ये बदल करण्याते मान्य केले आहे. यापूर्वी दुपारी ४ व रात्री ८ वाजता सामने सुरु व्हायचे. किंग्स इलेव्हन पंजाब आपले सातपैकी चार ‘होम’ सामने मोहाली येथे व तीन सामने इंदूर येथे खेळणार आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशननच्या लोढा समितीच्या शिफारसी अंमलात आणण्याबाबतीत न्यायालयात खटला सुरू असून यानंतर जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियम या राजस्थान फ्रेंचायझीच्या आवडत्या ‘होम’ मैदानाबद्दल निर्णय घेता येणार आहे. न्यायालयाच्या निकालास विलंब झाल्यास राजस्थानला आपले ‘होम’ सामने पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.