कॅनडा, झिंबाब्वे संघाचा विजय

0
103

आयसीसी अंडर १९ विश्‍वचषक स्पर्धेत काल नवव्या स्थानासाठीचे प्ले ऑफ सामने खेळविण्यात आले. यातील पहिल्या प्ले ऑफ लढतीत कॅनडाने पापुआ न्यू गिनीचा ८० धावांनी तर दुसर्‍या सामन्यात झिंबाब्वेने नामिबियाचा ७ गडी व १८३ चेंडू राखून पराभव केला.

पहिल्या सामन्यात कॅनडाने प्रथम फलंदाजी करताना आकाश गिल (१२०) याच्या बळावर निर्धारित ५० षटकांत २६५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पीएनजीचा डाव १८५ धावांत आटोपला. दुसरा सामनादेखील एकतर्फीच ठरला. नामिबियाचा डाव ११३ धावांत संपवल्यानंतर झिंबाब्वेने १९.३ षटकांत ३ गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले.