गाडीतील लॅपटॉप चोरीप्रकरणी अटक

0
49
पणजी येथे आयनॉक्सजवळ पार्क करून ठेवलल्या गाडीतून लॅपटॉप व ८० हजार रु. चोरून नेण्याची जी घटना घडली होती त्या प्रकरणी संशयित म्हणून पणजी पोलिसांनी बेंगलोर येथील एक युवक सुमेर पाशा (१९) याला अटक केली आहे.

रोशल मास्कारान्हेस यांनी आयनॉक्सजवळ गाडी पार्क करून ठेवली असता ही चोरी झाली होती.