खोटा अहवाल सादर केल्याचा कर्नाटकच्या साक्षीदारावर ठपका

0
66

>> म्हादई लवादासमोर कर्नाटकची गोची

म्हादईप्रश्‍नी कालपासून नवी दिल्लीत म्हादई जललवादासमोर सुनावणीस प्रारंभ होऊन कर्नाटकाचे साक्षीदार गोसाईन यांनी २००३ सालाचा जो केंद्रीय जल आयोगाचा अहवाल सादर केलेला त्याबाबत मोठ्या प्रमाणात तङ्गावत, खोटी आकडेवारी असल्याचा ठपका गोव्यातर्ङ्गे ठेवण्यात आला व पहिल्याच प्रश्‍नी साक्षीदार उघडा पडल्याने कर्नाटकाची गोची झाली.
अहवालात ज्या तङ्गावती आहेत त्याबाबत साक्षीदार योग्य पद्धतीने उत्तर देऊ न शकल्याने पुरते गोंधळले. त्यानंतर गोसाईन यांनी पूर्णपणे नवीन अहवाल सादर करताना कच्चा अहवाल देण्याचा प्रयत्न केला. मात्र काल सादर केलेला अहवाल ८० पानांचा तर पूर्वीचा अहवाल ६४ पानांचा असल्याचे यावेळी उघड झाले. यावरून लवादासमोर साक्षीदार पूर्णपणे खोटारडेपणा करत असल्याचे उघड झाले. आवश्यक अहवालाच्या प्रती संबंधित वकील व लवादाला देण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या नसल्याबद्दलही लवादाने साक्षीदाराला ङ्गैलावर घेतले.
गोव्यातर्ङ्गे आत्माराम नाडकर्णी यांनी साक्षीदाराची भंबेरी उडवली. खोटारडेपणा करून उलटतपासणीच्या वेळी कोणत्या प्रकारचे ताळतंत्र व प्रामाणिकपणा न बाळगता उलटतपासणीचीच थट्टा करत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
नाडकर्णी यांच्या समवेत दत्त प्रसाद लवंदे, पकंज वेर्णेकर, संतोष रिबेलो, प्रताप वेणुगोपाल, जय कामत व चेतन पंडित यावेळी उपस्थित होते. आज पुन्हा उलटतपासणी घेण्यात येणार आहे. २००३ सालच्या केंद्रीय जल आयोगाच्या अहवालात ङ्गेरङ्गार करून अहवालात तङ्गावत केल्याचे कालच्या सुनावणीवेळी उघड झाले.