खासगी शाळांच्या अनुदानात वाढ करा

0
35

>> आमदारांची मागणी

विधानसभेत ज्येष्ठ कॉंग्रेस नेते प्रतापसिंह राणे यांनी खासगी शाळांच्या वार्षिक अनुदानप्रश्‍नी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या वेळी विरोधी आमदारांनी खासगी अनुदानित शाळांच्या व्यवस्थापन अनुदानात वाढ करण्याची मागणी केली. यावेळी वर्षभराच्या काळात अनुदानित शाळांच्या व्यवस्थापन अनुदानप्रश्‍नी तोडगा काढला जाऊ शकतो. बालरथ कर्मचार्‍यांना दोन महिन्यांचा पगार देण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

खासगी शाळा व्यवस्थापकांना दरवर्षी विद्यालयाच्या व्यवस्थापनावर जास्त खर्च करावा लागतो. विद्यालयात नवनवीन साधनसुविधा उपलब्ध कराव्या लागतात, असे आमदार राणे यांनी सांगितले.

कनेक्टिव्हिटीचा प्रश्‍न सोडवा
ऑनलाइन शिक्षणासाठी कनेक्टिव्हिटीचा प्रश्‍न सोडविण्याची मागणी आमदारांना गोवा विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर बोलताना काल केली. राज्यातील विविध भागात कनेक्टिव्हिटीची समस्या असल्याची तक्रार आमदारांनी केली. कनेक्टिव्हिटीची समस्या सोडविण्यासाठी नवीन मोबाईल टॉवर्स उभारण्याची गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यातील सर्वच भागात आवश्यक साधनसुविधा उभारण्यास मान्यता दिली पाहिजे, अशी मागणी विरोधी आमदार सुदिन ढवळीकर, आमदार प्रतापसिंह राणे, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार रोहन खंवटे, आमदार चर्चिल आलेमाव व इतरांनी केली.
राज्यात काही ठिकाणी मोबाईल टॉवर्स उभारण्यात विरोध केला जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली.