खाणबंदीप्रश्‍नी जुलैत दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

0
111

राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी येत्या जुलै महिन्यात नवी दिल्ली येथे उच्च पातळीवरील बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी व इतर सहभागी होणार आहे. साधारण येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत खाण बंदीच्या प्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यातील कामगार नेत्यांशी खाण बंदीच्या प्रश्‍नावर विचार विनिमय करण्यासाठी एक बैठक काल घेतली. खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे खाण मालकांनी कामगारांना कामावरून कमी करू नये. केंद्राच्या सहकार्याने खाण बंदीच्या प्रश्‍नावर निश्‍चित तोडगा निघेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.
कामगार नेते पुती गावकर, ख्रिस्तोफर फॉन्सेका यांना सरकारकडून बंद पडलेल्या खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याबाबत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.