Home बातम्या खनिजवाहू ट्रकांच्या १६ चालकांना अटक

खनिजवाहू ट्रकांच्या १६ चालकांना अटक

0

सायंकाळी ६ नंतर खनिज वाहतूक करण्यास न्यायालयाची बंदी हुकूम असतानाही उसगाव तिस्क भागातून खनिज वाहतूक करणार्‍या ट्रकांविरुद्ध दि. ९ रोजी तेथील नागरिकांची फोंडा पोलिसांत तक्रार केली होती. त्यानुसार फोंडा पोलीस स्टेशनचे उपअधीक्षक सेराफीन डायस व निरीक्षक सी. एल. पाटील यांनी रात्री स्टाफसह जाऊन रात्री आठ वाजता सहा ट्रक ताब्यात घेऊन फोंडा पोलीस स्टेशनवर आणले.

या व्यवहारात असलेल्या सोळा ट्रक चालकांना अटक केली. न्यायालयाच्या बंदी आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अटक केलेल्या ट्रक चालकांना काल न्याय दंडाधिकार्‍यांसमोर उभे केले असता त्यांची वैयक्तिक जामिनावर सुटका करण्यात आली. या भागातून रात्री उशिरा खनिज वाहतूक करणार्‍या ट्रक चालकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस गस्त ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.