कोविडने मृत्यू आलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांचे सर्वेक्षण करणार

0
46

गोव्यात आलेल्या कोरोना लाटेच्या वेळी कोविडचा संसर्ग झाल्याने कुटुंबातील ज्या कर्त्या व क’ावणार्‍या व्यक्तींचा ’ृत्यू झाला त्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सप्टेंबर ’हिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ह्या सर्वेक्षणाचे का’ पूर्ण केले जाणार आहे.

राज्य सरकारच्या स’ाजकल्याण खात्यातर्फे हे सर्वेक्षण काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी शिक्षण खाते, उच्च शिक्षण संचालनालय, महिला आणि बालविकास खाते, आरोग्य सेवा संचालनालय आदी खात्यांतील समुपदेशकांची हे सर्वेक्षणाचे काम हाती घेऊन पूर्ण करण्यासाठी मदत घेण्यात येणार आहे. हे काम हाती घेऊन ते पूर्ण करण्यासाठी ह्या समुपदेशकांना ६ सप्टेंबर २०२१ पर्यंतचा अवधी देण्यात येणार आहे.

ह्या सर्वेक्षणामुळे राज्य सरकारला कोविडमुळे राज्यातील किती कुटुंबातील कर्त्या व कमावणार्‍या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे हे कळण्याबरोबरच ह्या कुटुंबांना आवश्यक ती मदत देणेही शक्य होणार आहे असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या चोवीस तासांत राज्यात ४९२० जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,७३,३५७ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६२ टक्क्यांवर खाली आले आहे. इस्पितळांतून काल ८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

चोवीस तासांत ७९ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत कोरोनामुक्त झालेल्याची संख्या ७९ असून सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६९,२३९ एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात १४ जणांना भरती करण्यात आले.
काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने १२२ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.

सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मडगाव येथे असून त्यांची संख्या ७७ आहे. पणजीतीलही रुग्णसंख्येत वाढ झाली असून ती ६७, बेतकीत ५३ तर शिवोलीत ५० रुग्ण असून कासावलीतील रुग्णसंख्येत घट झाली असून इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत.

आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्यांची संख्या २८,९५७ एवढी असून गृहविलिनीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२०,९२३ एवढी आहे. राज्यात आतापर्यंत ११,७३,०७१ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.

गेल्या चोवीस तासांत कोरोनाने १३६ बाधित
राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही मात्र १३६ जण बाधित सापडले आहेत. तसेच गेल्या चोवीस तासांत ७९ जण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली असून ती ९३२ एवढी झाली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता ३१८६ एवढी आहे.