कोलवाळ तुरुंगात कैद्यांना हलविण्याविषयी लवकरच निर्णय

0
89

कोलवाळ येथील मध्यवर्ती तुरुंगाचे काम यापूर्वीच पूर्ण झालेले असून आग्वादसह राज्यातील सर्व कैद्यांना तेथे हलविण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबतीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. सुमारे ६०० कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था वरील कारागृहात करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी आग्वाद तुरुंगात गर्दी होत असल्याच्या प्रकाराची दखल घेऊन न्यायालयाने नवे कारागृह बांधण्याची सरकारला सूचना केली होती. त्यानंतर सरकारने कोलवाळ येथे तुरुंग उभारण्याचा निर्णय घेतला.
या कारागृहाचे कामही पूर्ण झाले आहे. आग्वाद येथून आतापर्यंत अनेकदा कैद्यांनी पलायन केले आहे. त्यामुळे वरील नवे कारागृह उभारताना कैद्यांना कोणत्याही पद्धतीने पलायन करता येणार नाही याची काळजी घेतली आहे.