कोलकात्यात दहशतवादी हल्ले होण्याबाबत इशारा

0
82

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ले होण्याबाबत कोलकाता पोलिसांना इशारा दिला असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले. कोलकात्यात विशेष करून बंदर परिसरात दहशतवादी हल्ले होण्याबाबत गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिला असल्याचे या अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे बंदर भागात सुरक्षा बंदोबस्त वाढविल्याचे हा अधिकारी म्हणाला. यामुळे कोलकाता बंदरातील आयएनएस खुक्री व आयएनएस सुमित्रा ही नौदलाची जहाजे पाहण्यासाठी आलेल्या लोकांना बंदरात प्रवेश नाकारण्यात आला.