कोलकाता नाइटरायडर्सचा क्वॉलिफायर-२मध्ये प्रवेश

0
99

>> आयपीएल एलिमिनेटर

>> राजस्थानचे आव्हान संपुष्टात

कर्णधार दिनेश कार्तिकचे दमदार अर्धशतक आणि आंद्रे रसेलच्या नाबाद ४९ धावांची आकर्षक खेळीच्या जोरावर कोलकाता नाइटरायडर्सने राजस्थान रॉयल्स संघावर २५ धावांनी मात करीत अंतिम फेरीत प्रवेशाच्या आपल्या आशा जिवंत राखताना क्वॉलिफायर-२मध्ये प्रवेश केला. आता उद्या २५ रोजी होणार्‍या क्वॉलिफायर-२ फेरीत कोलकाता नाइटरायडर्सला सनरायझर्स हैदराबाद संघाशी दोन हात करावे लागणार आहेत.

कोलकात्याकडून मिळालेल्या १७० धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाला ४ गड्यांच्या १४४ धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि राहुल त्रिपाठी यांनी पहिल्या विकेटसाठी ५.१ षट्‌कांत ४७ धावांची आक्रमक सुरुवात करून दिली. राहुल २० धावा जोडून परतला. पियुष चावलाने त्याला स्वतःच्याचा गोलंदाजीवर टिपले. राहुल त्रिपाठी बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने संजू सॅमसनच्या साथीने संघाचा डाव सावरताना दुसर्‍या विकेटसाठी ६२ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. परंतु त्यासाठी या दोघांनी ९ षट्‌के घेतल्याने त्यांच्या संथ खेळीचा फटका संघाच्या धावगतीवर बसला. रहाणे ४१ चेंडूत ४६ धावा करून परतला. तर संजू सॅमसनने ४ चौकार व २ षट्‌कारांनिशी ३८ चेंडूत ५० धावांची अर्धशतकी खेळी करीत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु धावगती वाढल्यामुळे त्याचे प्रयत्न अपुरे पडले. स्टुअर्ट बिन्नी आपले खाते खोलण्यापूर्वीच तंबूत परतला. हेन्रिक क्लासेन १८ तर कृष्णप्पा गौतम ९ धावांवर नाबाद राहिले. कोलकात्यातर्फे पियूष चावलाने २ तर प्रसिद्ध कृष्णा व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाइटरायडर्सने ७ गडी गमावत १६९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. सुनिल नारायण (४), ख्रिल लिन (१८), रॉबिन उथप्पा (३) आणि नितीश राणा (३) हे चौघे स्वस्तात बाद झाल्याने नाइटरायडर्स काहीसा बॅकफूटवर गेला होता. परंतु दिनेशा कर्तिकने ३८ चेंडूत ४ चौकार व २ षट्‌कारांसह ५२ धावांची अर्धशतकी खेळी करीत शुभमन गिलच्या (२८) संघाला विजयपथावर नेले. त्यानंतर आंद्रे रसेलने ३ चौकार व ५ उत्तुंग षट्‌कार खेचत २५ चेंडूत नाबाद ४९ धावांची विस्फोटक खेळी करीत संघाला क्वॉलिफायर-२मध्ये प्रवेश मिळवून दिला.

धावफलक,
कोलकाता नाइटरायडर्स ः सुनील नारायण यष्टिचित हेन्रिक क्लासेन गो. कृष्णप्पा गौतम ४, ख्रिस लीन झे. व गो. श्रेयस गोपाल १८, रॉबिन उथप्पा झे. व. गो. कृष्णप्पा गौतम ३, नितीश राणा झे. जयदेव उनाडकट गो. जोफ्रा आर्चर ३, दिनेश कार्तिक झे. अजिंक्य रहाणे गो. बेन लाफलिन ५२, शुभमन गिल झे. हेन्रिक क्लासेन गो. जोफ्रा आर्चर २८, आंद्रे रसेल नाबाद ४९, जॅवोन सीरल्स झे. जोफ्रा आर्चर गो. बेन लाफलिन २, पीयूष चावला नाबाद ०. अवांतर ः १०. एकूण २० षट्‌कांत ७ बाद १६९.

गडी बाद होण्याचा क्रम ः १-४ (सुनील नारायण ०.२), २-१७ (रॉबिन उथप्पा २.१), ३-२४ (नितीश राणा ३.४), ४-५१ (ख्रिस लीन ८), ५-१०६ (शुभमन गिल १४.२), ६-१३५ (दिनेश कार्तिक १७.१), ७-१६४ (जॅवोन सीरल्स १९.४) गोलंदाजी ः कृष्णप्पा गौतम ३/०/१५/२, जोफ्रा आर्चर ४/०/३३/२, जयदेव उनाडकट २/०/३३/०, ईश सोढी ४/०/१५/०, श्रेयस गोपाल ४/०/३४/१, बेन लाफलीन ३/०/३५/२.

राजस्थान रॉयल्स ः अजिंक्य रहाणे झे. व गो. कुलदीप यादव ४६, राहुल त्रिपाठी झे. व गो. पियुष चावला २०, संजू सॅमसन झे. जॅवोन सीअर्ल्स गो. पियुष चावला ५०, हेन्रिक क्लासेन नाबाद १८, स्टुअर्ट बिन्नी झे. ख्रिस लिन गो. प्रसिद्ध शर्मा ०, कृष्णप्पा गौतम नाबाद ९.
अवांतर ः १. एकूण २० षट्‌कांत ४ बाद १४४ धावा. गडी बाद होण्याचा क्रम ः १-४७ (राहुल त्रिपाठी ५.१), २-१०९ (अजिंक्य रहाणे १४.१), ३-१२६ (संजू सॅमसन १६.५), ४-१३० (स्टुअर्ट बिन्नी १८)
गोलंदाजी ः आंद्रे रसेल ३/०/२२/०, प्रसिद्ध शर्मा ४/०/२८/१, पीयूष चावला ४/०/२४/२, सुनील नारायण ४/०/३९/०, कुलदीप यादव ४/०/१८/१, जॅवोन सीरल्स १/०/१३/०.