डीव्हिलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

0
77

>> ट्विटरवरून व्हिडीओद्वारे केली घोषणा

दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज एबी डीव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. काल त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एका छोटा व्हिडीओ शेअर करत आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.
ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओत निवृत्तीची घोषणा करताना डीव्हिलियर्स म्हणाला की, ‘प्रामाणिकपणे सांगतो, आपला डाव संपला आहे. आता मी खूप थकलोय.

निवृत्त होण्याचा मी अनेक दिवसांपासून विचार करत होतो. सध्या माझा फॉर्म चांगला आहे. तरीही मी निवृत्त होत आहे. यापुढच्या काळात तरुण खेळाडूंना संधी मिळणं गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मी ज्या प्रकारे क्रिकेट सामने खेळतो आहे, त्यामुळे मला आता थकायला झालं आहे असं म्हणत डीव्हिलियर्सने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच प्रमाणे त्याने आपल्या चाहत्यांचेही आभार व्यक्त केले. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिका आम्ही नुकतीच जिंकली. त्यामुळे क्रिकेट सोडण्याची हीच योग्य वेळ असल्याचे वाटू लागलंय,’ असेही तो म्हणाला.
एबीने १७ डिसेंबर २०१४ साली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकन संघाकडून कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर २ फेब्रुवारी २००५मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने वन-डे पदार्पण केेले होते. तर २४ फेब्रुवारी २००६ रोजी त्याने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.