कोलकाताला हरवून दिल्ली द्वितीय क्रमावर

0
94

युवा करूण नायर आणि पदार्पणातील सॅम बिलिंग्स यांची दमदार फलंदाजी तथा सामनावीर कार्लोस ब्रँथवेट आणि कर्णधार झहीर खानची प्रभावी गोलंदाजीवर दिल्ली डेयरडेविल्सने कोलकाता नाइटरायडर्सवर २७ धावांनी विजय मिळवितानाच आयपीएल गुणतक्त्यातही द्वितीय क्रमावर झेप घेतली.
फिरोजशहा कोटला मैदानावरील या सामन्यात, पहिल्याच षटकात दोन फलंदाज बाद झाल्यानंतरही, यजमानानी जिगरबाज खेळीत ८ बाद १८६ धावांचा स्पर्धात्मक टप्पा गाठला आणि नंतर पाहुण्यांना नऊ चेंडू बाकी असताना १५९ धावात
उखडले.
करूण नायर (५० चेंडूत ६८) आणि बिलिंग्स (३४ चेंडूत ५४) यांची दमदार अर्धशतके आणि कार्लोस ब्रॅथवेटच्या (११ चेंडूत ३४) फटकेबाजीवर डेयरडेविल्सने डळमळीत प्रारंभानंतरही तगडे आव्हान खडे केले. वेस्ट इंडीजचा अष्टपैलू ब्रँथवेटने नंतर कोलकाता नाइटरायडर्सची मधली फळी कापून काढीत सामनावीर पुरस्कार पटकावला.
उद्दिष्टाचा पाठलाग करतानाच केकेआरचा हा स्पर्धेंतील पहिला पराभव होय. सलामीवीर रॉबिन उथप्पा (५२ चेंडूत ७२) वगळता कोलकाताचा अन्य एकही फलंदाज विशेष प्रतिकार दर्शवू शकला नाही.
नायर आणि बिलिंग्सने फटकेबाजीचा मोह टाळीत प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळताना द्रुतगती आणि फिरकीचा समर्थपणे सामना केला. ब्रॅथवेटने मात्र अखेरीस दांडपट्टा घुमविताना ३ षटकार आणि तेवढ्याच चौकारासह ३४ धावा चोपल्या. केकेआरने तीन फिरकी गोलंदाज खेळविले पण ब्रँड हॉग, सुनील नरेन आणि पीयूष चावला यांनी ९ षटकात ८५ धावा दिल्या. द्रुतगती आंद्रे रसेल (३-२६) आणि उमेश यादव (३-३३) यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
याआधीच्या सामन्यात विशेष प्रभाव दर्शवू न शकलेला दिल्लीचा कर्णधार झहीर खानने पाहुण्यावर प्रारंभिक नियंत्रण राखताना प्रतिस्पर्धी कर्णधार गौतम गंभीर (६) आणि बढती दिलेला पीयूषच चावला (८) याना बाद केले. युसुफ पठाणही (१०) स्वस्तात बाद झाला.
एक बाजू लावून धरलेला सूर्यकुमार यादव (२७) आणि उथप्पाने डाव सावरीत दहाव्या षटकात ३ बाद ८८वर नेले. पण बाराव्या षटकात सूर्यकुमार बाद झाला आणि पुन्हा घसरगुंडी सुरू झाली. अखेर अठराव्या षटकात उथप्पाही मॉरिसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि अखेर कोलकाताचा डाव १५९ धावावर आटोपला.
या विजयासह दिल्ली डेयरडेविल्सने ६ सामन्यातून ८ गुण जमवीत कोलकाता नाइट रायडर्सला (७ सामन्यातून ८ गुण) तिसर्‍या क्रमावर घसरविले.
धावफलक
दिल्ली डेयरडेविल्स : क्विंटन डी कॉक झेल ब्रॅड हॉग गो. Aआंद्रे रसेल १, श्रेयश अय्यर पायचीत Aगो. Aआंद्रे रसेल ०, संजू सॅमसन पायचीत सुनील नरेन १५, करूण नायर पायचीत उमेश यादव ६८, सॅम बिलिंग्ज त्रिङ्गळाचीत उमेश यादव ५४, क्रिस मॉरीस त्रङ्गळाचीत उमेश यादव ०, कार्लोस ब्रॅथवेट झेल सुनील नरेन गो. आंद्रे रसेल ३४, ऋषभ पंत धावचीत ४, शामी अहमद नाबाद ० , अमित मिश्रा नाबाद ०, अवांतर १०, एकूण २० षटकात ८ बाद १८६.
गडी बाद क्रम : १/१(श्रेयश अय्यर,०.३), २/२(क्विंटन डी कॉक,०.५), ३/३२(संजू सॅमसन ,५.०), ४/१३७(नायर ,१६.२), ५/१३७(क्रिस मॉरीस,१६.४), ६/१७४(बिलिंग्स,१८.४), ७/१८२(ब्रँथवेट ,१९.२ ), ८/१८६(पंत,२०.०)
गोलंदाजी : आंद्रे रसेल ४/० /२६/३, जेसन होल्डर ४/०/३५/०, सुनील नरेन ३/०/२२/१, उमेश यादव ३/०/३३/३, ब्रॅड हॉग ४/०/३९/०, पियुष चावला २/०/२४/०.
कोलकाता नाइटरायडर्स : रॉबिन उथप्पा झे. नायर गो. मॉरिस ७२, गंभीर झे. अय्यर गो. खान ६, पियुष चावला पायचित गो. खान ८, युसुफ पठाण झे. मिश्रा गो. ब्रॅथवेट १०, यादव झे. अय्यर गो. ब्रॅथवेट २१, सतिश झे मॉरिस गो. ब्रॅथवेट ६, रसेल झे. आणि गो. मिश्रा १७, होल्डर धावचित ०, उमेश यादव झे. मॉरिस गो. खान २, सुनिल नरेन धाचवित ४, ब्रॅड हॉग नाबाद ०, अवांतर १३, एकूण १८.३ षटकात सर्वबाद १५९.
गडी बाद क्रम : १/२१( गंभीर, २.६), २/३३ (चावला, ४.४), ३/५८ (पटाण, ७.५), ४/९४ (यादव ११.२), ५/१०७ (सतिश, १३.३), ६/१५१ (रसेल, १६.६), ७/१५२ (होल्डर, १७.२), ८/१५३ (उथप्पा, १७.४), ९/१५९ (नरेन, १८.२), १०/१५९ (उमेश यादव, १८.३).,
गोलंदाजी : झहीर खान ३.३/०/२१/३, मोहम्मद शामी ४/०/३३/०, मॉरिस ३/०/१९/१, ब्रँथवेट ४/०/४७/३, अमित मिश्रा ४/०/३६/१.