कोरोना लसीकरण मोहिमेनंतर सीएए लागू करणार : अमित शहा

0
9

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोना लसीकरण मोहीम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करणार असल्याचे जाहीर केले आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी हे अमित शहा यांच्या भेटीसाठी मंगळवारी संसदेत पोहोचले होते. या भेटीनंतर अमित शहांनी हे आश्‍वासन दिल्याचे सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले.

सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी संसद भवनात अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील भाजपच्या कामकाजाबाबत आणि समस्यांबाबत चर्चा केली. या भेटीनंतर बोलताना सुवेंदू अधिकारी यांनी, अमित शहा यांनी कोरोना लसीकरण मोहीम संपल्यानंतर प्रलंबित असलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती दिली.

सुवेंदू अधिकारी यांनी या भेटीत अमित शाह यांच्यासमोर सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेससोबत सुरू असलेल्या राजकीय लढाईसंबंधीही अनेक मुद्दे मांडले. आपण शहांकडे भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करण्यासाठी तृणमूलच्या १०० नेत्यांची यादी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.