कोरोनाने मंगळवारी चार जणांचा मृत्यू

0
235

राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह नवीन १५४ रुग्ण आढळून आले असून आणखीन ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ६६७ झाली आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार १८२ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या १३८३ एवढी झाली आहे.

बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत आणखी १६६० स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील १५४ स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखी १९१ रुग्ण बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार १३२ एवढी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५६ टक्के एवढे आहे. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या आणखी ७७ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ४२ कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

पणजीत नवे ६ रुग्ण
पणजी महानगरपालिका परिसरात नवे ६ रुग्ण आढळून आले आहेत. पणजी परिसरातील कोरोना सध्याच्या रुग्णाची संख्या ८२ झाली आहे. मळा, मिरामार, करंजाळे, सांतइनेज, ३१ जानेवारी रस्ता पणजी या भागात नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
फोंडा परिसरात कोरोनाचे सध्याचे १२० रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागातील कोरोनाच्या सध्याच्या रुग्णांची संख्या शंभरांपेक्षा कमी आहेत. वास्को येथे ९६ रुग्ण, मडगाव परिसरात ९२ रुग्ण आहेत. पर्वरी येथे ७२ रुग्ण, चिंबल येथे ६६ रुग्ण आहेत.

चारजणांचा मृत्यू
बांबोळी येथील गोमेकॉमध्ये २ रुग्ण, मडगाव येथील ईएसआय इस्पितळात १ रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच, मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मडगाव येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्ण, फातोर्डा येथील ८६ वर्षीय महिला रुग्ण, आके येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आके येथील कोरोना रुग्णाला मृतावस्थेत इस्पितळात आणण्यात आल्याची माहिती दैनंदिन अहवालात देण्यात आली आहे. तसेच, ठाणे – महाराष्ट्र येथील ५९ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर महिलेला ३० ऑक्टोबरला इस्पितळात दाखल करण्यात आली होती.