ब्रिक्स परिषदेत मोदींचा पाकिस्तानवर निशाणा

0
232

दहशतवाद आज जगापुढील सर्वात मोठी समस्या आहे. दहशतवादाचे समर्थन करणार्‍या आणि सहकार्य करणार्‍या देशांना दोषी ठरवले जावे आणि या समस्येचा संघटितपणे सामना केला पाहिजे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पाकिस्तानवर निशाणा साधला. ब्रिक्स समूहाच्या व्हर्च्युअल शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी पुन्हा एकदा यूएन सुरक्षा परिषदेतील बदलाचा मुद्दाही उपस्थित केला.

भारतीय संस्कृतीमध्ये संपूर्ण जगाला एका कुटुंबासारखे मानले असून शांती राखण्यासाठी सर्वाधिक सैनिक भारताने गमावले असल्याचेही मोदी म्हणाले.
कोरोना महामारीच्या काळात ब्रिक्स शिखर परिषद यावेळी व्हर्च्युअल आयोजित केली होती. यावेळी मोदींनी ब्रिक्सच्या सफल आयोजनाबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे अभिनंदन केले. मात्र यावेळी त्यांनी आपल्या भाषणात चीन राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांचा उल्लेखही केला नाही.