कोरोनाच्या नव्या रूपाचा १८ राज्यांमध्ये प्रादुर्भाव

0
208

कोरोनाच्या नवीन रुपाचा देशातील १८ राज्यात झाल्याचे आढळून आले आहे. कोरोनाचे हे नवे रूप ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधून भारतात आले असून या नवीन रुपाचे १९४ रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे केंद्राने या १८ ही राज्यांवर देखरेख ठेवण्यास सुरुवात केली आहे.
नवीन रुपाच्या कोरोनामधील १९४ रुग्णांपैकी १८७ जण ब्रिटनमध्ये आढळणार्‍या कोरोना रूपाचे आहेत. तर ६ जण दक्षिण आप्रिका व एकजण ब्राझिलमधील कोरोना रुपाचा रुग्ण आहे. हे नवे रुग्ण वाढलेल्यांमध्ये महाराष्ट्र, केरळ, तेलंगण, आंध्र प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पंजाब या राज्यांचा समावेश आहे.

लसीकरण थांबवणार

दरम्यान, आज व उद्या दि. २७ व २८ फेब्रुवारी असे दोन दिवस देशभरातील लसीकरण थांबवण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. या दोन दिवसांत को-विन मोबाइल ऍप सर्वसामान्यांसाठी अपडेट केले जाईल. या मोबाइल ऍपद्वारे सामान्य नागरिक लसीकरणासाठी स्वत:ची नोंदणी करू शकतील. आतापर्यंत या ऍपद्वारे केवळ आरोग्य सेवा आणि फ्रंटलाइन वर्कर्स नोंदणी करू शकत होते. या ऍपवर, लसीकरण करणार्‍या सर्व नागरिकांचा संपूर्ण डेटा उपलब्ध आहे.