>> राज्यात बुधवारी एकाचा मृत्यू, ८० बाधित
कोविडमुळे राज्यात काल आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने राज्यात आतापर्यंत कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३१७८ एवढी झाली आहे. तर काल केलेल्या ५५६१ चाचण्यांपैकी ८० जणांना कोविडची लागण झाली असल्याचे दिसून आले. राज्यात कोरोनाची लागण होण्याची टक्केवारी सध्या १.५ एवढी आहे. तर रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.६५ टक्के एवढी आहे.
गेल्या २४ तासांत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही ८३ टक्के एवढी आहे. तर काल इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ६ एवढी आहे.
सध्या राज्यात सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ही ८८० एवढी आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,७२,७६३ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर इस्पितळांतून काल ३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
चोवीस तासांत ८३ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत राज्यात ८३ जण बरे झाले आहेत. सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६८,७०५ एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात २० जणांना भरती करण्यात आले. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने ६० जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.
सध्या विविध आरोग्य केंद्र परिसरात असलेल्या रुग्णांची संख्या डिचोली-९, साखळी – ३६, पेडणे-२२, वाळपई-२१, म्हापसा-३६, पणजी-५५, हळदोणा-९, बेतकी-२२, कांदोळी-४१, कांसारवर्णे-५, कोलवाळ-३२, खोर्ली-२५, चिंबल-३९, शिवोली-३२, पर्वरी-२८, मयें-३, कुडचडे-२५, काणकोण-३३, मडगाव-८४, वास्को-१०, बाळ्ळी-२१, कांसवली-५७, चिंचोणे-११, कुठ्ठाळी-४३, कुडतरी-२२, लोटली-१६, मडकई-९, केपे-१७, सांगे-३१, शिरोडा-१८, धारबांदोडा-१४, फोंडा-२८, नावेली-१८ अशी आहे.