कॉंग्रेस पक्षासोबत युतीचा विचार सोडला ः सरदेसाई

0
38

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाशी युती करण्याबाबतचा विचार आता गोवा फॉरवर्ड पक्षाने सोडून दिला असल्याचे काल गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी सांगितले.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाशी युती करण्यास कॉंग्रेस पक्षाला रस नसल्याचे कॉंग्रेस पक्षाचे गोवा विधानसभा निवडणुकीसाठीचे वरिष्ठ निरीक्षक पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही युतीचा विचार आता सोडून दिला आहे, असे विजय सरदेसाई म्हणाले.

पी. चिदंबरम यांनी केलेल्या वरील वक्तव्यामुळे आता आम्हीही त्यांच्याशी युती करण्याचा नाद सोडून दिला आहे, असे सरदेसाई म्हणाले.
गोवा फॉरवर्ड पक्ष गेल्या बर्‍याच काळापासून कॉंग्रेस पक्षाकडून आपणाला युतीचा प्रस्ताव येईल याची वाट पाहत असतानाच पी. चिदंबरम यांनी केलेल्या वरील वक्तव्यामुळे गोवा फॉरवर्ड पक्षाने आता युतीची आशा सोडून दिली आहे.