कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, तसेच कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जवळचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची प्रकृती अत्यवस्थ असून कोरोनामुळे त्यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
७१ वर्षीय पटेल यांनी १ ऑक्टोबरला ट्वीटरद्वारे आपल्याला कोरोना झाला असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुग्रामच्या मेदान्ता इस्पितळामध्ये त्यांना आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले असून तेथे उपचार सुरू आहेत अशी माहिती काल त्यांचे पुत्र फैसल यांनी दिली. त्यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली आहे.