कॉंग्रेसचा मोर्चा राजभवनवर रोखला

0
14

कॉंग्रेस पक्षाने भाजप सरकारवर भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाचे २१ आरोप असलेले आरोपपत्र राज्यपालांना सादर करण्यासाठी राजभवनावर धिक्कार मोर्चा काल नेला.

या मोर्चात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, कॉँग्रेसचे नेते कन्हैया कुमार, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, खासदार फ्रान्सिस सार्दीन, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या मोर्चाला दोनापावल येथील सर्कल जवळून प्रारंभ करण्यात आला. यावेळी भाजपविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर कॉँग्रेसचा मोर्चा रोखला.

यावेळी विरोधी पक्षनेते कामत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करताना राज्यात लोकशाहीची थट्टा केली जात असल्याचा भाजपवर आरोप केला. राज्यपालांकडे म्हणणे मांडण्याचा सर्व नागरिकांना अधिकार आहे. राज्यपालांनी कॉँग्रेस शिष्टमंडळाला संध्याकाळी ५ वाजता भेटण्यासाठी वेळ दिली होती, असे कामत यांनी यावेळी सांगितले.