Home बातम्या केरळमच्या मुख्यमंत्रिपदीव्ही. डी. सतीशन शपथबद्ध

केरळमच्या मुख्यमंत्रिपदीव्ही. डी. सतीशन शपथबद्ध

0

काँग्रेस नेते व्ही. डी. सतीशन यांनी काल केरळमचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला (20 मंत्री) पद व गोपनीयतेची शपथ दिली.
या सोहळ्याला राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या व्यतिरिक्त, माजी मुख्यमंत्री पी. विजयन, भाजप नेते राजीव चंद्रशेखर आणि काँग्रेसशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.

मंत्रिमंडळात 14 नवीन चेहरे
केरळम मंत्रिमंडळात पहिल्यांदाच 14 आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. यामध्ये सी. पी. जॉन आणि एन. शमसुद्दीन, के. एम. शाजी, पी. के. बशीर आणि व्ही. ई. अब्दुल गफूर, पी. सी. विष्णूनाथ, रोझी एम. जॉन, बिंदू कृष्णा, टी. सिद्दिकी, के. ए. तुळसी आणि ओ. जे. जनिश यांचा समावेश आहे. काँग्रेसने सभापती आणि उपाध्यक्ष ही पदे आपल्याकडे ठेवली आहेत. थिरुवनचूर राधाकृष्णन यांची सभापती आणि शनिमोल उस्मान यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. केरळम विधानसभेत आमदारांच्या शपथविधीनंतर 22 मे रोजी सभापती निवडले जातील.