केपेत तरुणीला अडवून अंगावर डेटॉल ओतले

0
92

केपे येथील एका तरुणीला दोन अज्ञात तरुणांनी वाटेत अडवून तिच्या अंगावर डेटॉल ओतले. त्यामुळे ती तरुणी बेशुद्ध पडली. या प्रकरणी तिला तात्काळ हॉस्पिस्यू इस्पितळात दाखल केले.
काल मंगळवारी सकाळी सदर १८ वर्षांची तरुणी आपल्या दुचाकीवरून केपे येथून चांदर येथे कामाला निघाली होती. त्यावेळी पल्सर मोटारसायकलने आलेल्या दोन तरुणांनी तिला वाटेत अडवून आपल्या दुचाकीवर बसवण्यासाठी जबरदस्ती केली. पण तिने नकार दिल्याने त्या तरुणांनी तिच्या अंगावर डेटॉल ओतले. त्यावेळी तिने घाबरून आरडाओरडा केला असता ते तरुण तेथून पळून गेले व ती बेशुद्ध पडली. तिला तात्काळ इस्पितळात दाखल केले असून ती घाबरलेली असल्याचे मायणा कुडतरी पोलिसांनी सांगितले.